( संगमेश्वर / प्रतिनिधी )
रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात टँकर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात बुलेटस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 26 डिसेंबर रोजी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात मृत्यूप्रकरणी बुलेटस्वार चालक स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यापकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालासो खाशाबा शेवाळे (58, गावठान, कराड, सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बुलेट स्वाराचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर उगळे यांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालासो शेवाळे हा आपल्या ताब्यातील बुलेट (एमएच 50,क्यू 6184) घेऊन कोल्हापूर ते रत्नागिरी असा आंबा घाटातून येत होता. आंबा घाटातील एका अवघड वळणावर त्याने टँकरला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा टायरखाली येऊन मृत्यू झाला. तसेच दोन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यापकरणी लालासो शेवाळे याच्यावर भादविकलम 304 (अ), 279. 337. 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.