(ज्ञान भांडार)
नुकताच आंब्याचा सिजन सुरु झाला आहे. अनेक लोकांना आंबा जीव की प्राण असतो. त्यात क्वचितच अशी लोकं असतील, ज्यांना आंबा आवडत नसावा. गोड-गोड रसाळ आंबा उन्हाळ्यातील घाम आणि थकवा सगळंच विसरायला भाग पाडतो. परंतु आपल्याला सगळ्यात प्रिय असलेल्या या फळांच्या राजापासून शरीराशी संबंधीत काही समस्या उद्भवू शकतात. खरेतर आंबा खाताना आपण बऱ्याचदा अशा काही चुका करतो. ज्यामुळे आपल्या आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते.
आंबा हे फळ शरीरासाठी फार फायदेशीर आहे. अँटीऑक्सीडेंट, प्रोटीन, व्हिटॅमीन ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ची भरपूर मात्रा असलेले हे फळ शरीराला आरोग्यदाई आहे. पण, या फळाचे सेवन केल्यावर काही घटकांचे मुळीच सेवन करू नका. अन्यथा तुम्हाला आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल. कारण यांमुळे उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
कोल्ड्रिंक
आंब्यामध्ये खूप गोडवा असतो, त्यामुळे आंबा खाल्यानंतर कोल्ड्रिंक प्यायल्याने शरीरातील साखरेची पातळी अनेक पटींनी वाढू शकते, जे आरोग्यासाठी चांगले नाही.
पाणी
आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे पोटदुखी होऊ शकते. आंबा खाल्ल्यानंतर किमान अर्ध्या तासाने पाणी प्यावे. आंबा किंवा कोणतेही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे फळ पचायला जास्त वेळ लागतो किंवा त्यामुळे अपचनाचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे पोटात गॅस, पोटदुखी किंवा छातीत जळजळ होण्याची समस्याही होऊ शकते.
मसालेदार पदार्थ
आंबा खाल्ल्यानंतर मिरची किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यास त्वचेला खाज किंवा जळजळ होऊ शकते. काहींना रात्रीच्या जेवणात आंबा खायला आवडतो. पण ही सवय मोठी चूक ठरू शकते. कारण, यामुळे तुम्हाला छातीत जळजळ होणे किंवा पोट खराब होऊ शकते. त्याचबरोबर त्वचेचे आजारही होऊ शकतात.
दही
आंबा खाल्ल्यानंतर लगेच दही खाऊ नये. कारण, आंबा आणि दही मिळून पोटात जास्त कार्बन डायऑक्साइड तयार होतो. त्यामुळे आपल्याला पोटाचा त्रास होऊ शकतो. आंबा किंवा कोणत्याही फळासोबत दही खाणं टाळावे. कारण ते फळांसोबत खाल्ल्यास विष, सर्दी आणि ऍलर्जी यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.
गरम पेय
कोल्डड्रिंक्स प्रमाणे गरम पेय देखील आंब्यासोबत पिऊ नये. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
- आंबा खाल्यावर कारले, मिर्ची आणि दही रायता घटक बिलकुल खाऊ नका
कारले – आंबा खाल्यानंतर कारले मुळीच खाऊ नका. कारण, आंबा हा गोड असतो तर, कारले कडू. गोड पदार्थावर जेव्हा कडू पदार्थ खाल्ला जातो तेव्हा त्याची रिअॅक्शन येते. असा प्रकारे रिअॅक्शन झाली तर, त्या व्यक्तीला उलटी, मळमळ, श्वसनास त्रास आदी गोष्टींचा सामना करावा लागतो. काही प्रमाणात व्यक्ती आजारीही पडतो. आंबा खाल्ल्यानंतर कारले खाल्ल्याने पोटात अॅसिडिटी वाढते.
मिर्ची – आंबा खाल्यावर शक्यतो ३ तास तरी, मिर्चीचे सेवन करू नका. जर तुम्ही आंबा खाल्ल्यावर मिर्चीचे सेवन केले तर, तुम्हाला पोटात जळजळ, आग आदी गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.
दही रायता – आंबा खाल्ल्यावर चुकूनही दही रायता खाऊ नका. आंबा खाल्ल्यावर दही रायत्याचे सेवन केल्यास घसा, डोके दुखू शकते. सर्दी आणि खोकलाही संभवतो. तसेच, काही रूग्णांमध्ये हगवण लागण्याचे प्रमाणही बळावते. आंबा खाल्ल्यानंतर लगेच साधे दही सुद्धा खाऊ नये. कारण, आंबा आणि दही मिळून पोटात कार्बन डायऑक्साइड तयार होतो.