(ज्ञान भांडार)
सध्या आंब्याचा जोरदार सिझन सुरु आहे. आता आंबाही मुबलक प्रमाणात व स्वस्तही मिळत आहेत. मात्र बाजारात अनेक ठिकाणी रसायनांनी कृत्रिमरित्या पिकविलेले आंबे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. हे आंबे वरवर पाहता पिवळे धमक दिसत असले तरी आतून मात्र कच्चे, बेचव, तुरट व आरोग्यास थोडे हानिकारक असल्याचे आढळते. आंब्याच्या माध्यमातून शरीरात जाणार्या विषमय बाबींकडे आपण फारसे गांभीर्याने पाहत नाही.
आंब्याची गोड चव आणि पौष्टिकतेच्या दृष्टीने तो खूपच चांगला आहे. त्यामुळे आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. मात्र आंबा खाताना काही तारतम्य बाळगले पाहिजे. आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच नुकसान देखील आहेत. आंबा जेवढा चविष्ठ, आरोग्यदायी आहे तेवढाच त्याचे असे काही सायलेंट साइड इफेक्ट्स येतात जे शरीरासाठी खूप हानिकारक असतात.
आंबे खाण्याचे काही फायदे :
– आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक आहेत.
– आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकवा येतो थकवा वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.
– आंब्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
– चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त.
– शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात.
– व्हिटामिन बी6 मुळे रक्तातील ‘होमोसेस्टीना’चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो.
– आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते.
– आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
आंबे खाण्याचे काही नुकसान :
ऍलर्जी – आंबा खाल्ल्याने शरीरातील ऍलर्जीचा धोका वाढू शकतो. लेटेक्समुळे ऍलर्जी ग्रस्तांना सामान्य नुकसान होऊ शकते. विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती सिंथेटिक सामग्रीसाठी संवेदनशील असते. आंब्यामध्ये आढळणारे प्रथिने लेटेकसारखेच असते. ज्यामुळे आधीच ऍलर्जीने ग्रस्त असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो.
उच्च रक्तातील साखर – स्वादिष्ट आणि गोड आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मधुमेह किंवा इतर जीवनशैलीच्या विकारांच्या लोकांनी आंब्याचे प्रमाण काळजीपूर्वक ठेवले पाहिजे. या प्रकारचा आंबा आपल्या पचनक्रियेला साथ देत नाही. म्हणूनच डॉक्टर नेहमी फायबर समृद्ध आंबा खाण्याची शिफारस करतात जे पचन प्रक्रियेसाठी चांगले मानले जातात. कारण इतर फळांच्या तुलनेत आंब्यामध्ये कॅलरीज कमी, नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज जास्त असतात. यामुळेच याचे जास्त सेवन केल्याने तुमचे वजन वाढू शकते.
पोटाशी संबंधित समस्या – आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आंब्याचे जास्त सेवन केल्याने GI त्रास (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिस्ट्रेस) होऊ शकतो. वास्तविक त्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स IBS म्हणजेच इरिटेबल बोवेल सिंड्रोमला चालना देऊ शकतात आणि पचनसंस्था बिघडू शकतात.
– कच्ची कैरी किंवा आंब्याच्या अतिसेवनाने संधिवात आजार वाढू शकतो. ज्या लोकांना संधिवात आहे अशा लोकांनी आंब्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.
– आंब्याला पिकवण्यासाठी अनेकदा कॅल्शियम कार्बाइटचा मारा केला जातो. या केमिकलमुळे शरीराला मोठा धोका असतो.
– आंब्यात जवळपास 150 कॅलरीज असतात. जास्त कॅलरी खाल्ल्यास वजन वाढू शकते.
– आंबा हे गरम फळ आहे. त्यामुळे त्याच्या अधिक सेवनाने चेहऱ्यावर किंवा शरीरावरही मुरुम, पुरळ येऊ शकतात
आंबा खाल्ल्यानंतर या 5 गोष्टी कधीही खाऊ नयेत :
कॉल्ड्रिक्स पिवू नये
आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक पिण्याचा विचार करत असाल तर सावधान. आंबा आणि कोल्ड्रिंक एकत्र घेतल्यास पोटात घातक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते. कारण या दोन्हीमध्ये भरपूर साखर असते. ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकते.
काहींना रात्रीच्या जेवणात आंबा खायला आवडतो. पण ही सवय मोठी चूक ठरू शकते. कारण, यामुळे काहींच्या छातीत जळजळ किंवा पोट खराब होऊ शकते. त्याचबरोबर त्वचेचे आजारही होऊ शकतात.
आंबा खाल्ल्यानंतर कारले खाऊ नये. कारण, असे केल्याने मळमळ, उलट्या, धाप लागणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.