(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावचे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष म्हणून श्री.संजय जानू भुवड यांची बिनविरोध निवड झाली आहे. ते ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून परीचीत आहेत.
यावेळी सरपंच सौ.प्रिया सुवरे, उपसरपंच श्री शेखर उकार्डे, मंगेश मांडवकर, राजाराम जुवळे, अनंत भुवड, दीपक शिगवण, अमोल नेटके, ग्रामसेवक धडस, सोमा मांडवकर, दाजी भुवड, सदाशिव जोगले, नारायण बोले, प्रवीण कदम, सुरेश घडशी आदी उपस्थित होते.