(नवी दिल्ली)
अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जून रोजी संयुक्त राष्ट्र संघात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अध्यक्षदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. साबा कोरोसी यांनी या संदर्भात ट्विट करून ही माहिती दिली.
संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष साबा कोरोसी यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे: “संयुक्त राष्ट्र मुख्यालय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. तुमच्या सहभागाने हा कार्यक्रम आणखी खास बनेल. उत्तम आरोग्य आणि निरोगीपणासाठी योग जगाला एकत्र आणत आहे. जागतिक स्तरावर योग अधिकाधिक लोकप्रिय होत राहो.”
Looking forward to seeing you at the International Day of Yoga celebrations at the UNHQ. Your participation makes the programme even more special.
Yoga brings the world together towards furthering good health and wellness. May it keep getting more popular globally. https://t.co/QjPUZemOeo
— Narendra Modi (@narendramodi) June 16, 2023
आपल्या ट्विटमध्ये कोरोसी यांनी लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र सचिवालयात योग सत्राचे नेतृत्व करणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्थापनेसाठी मसुदा ठराव भारताने प्रस्तावित केला होता. या मसुद्यास तब्बल १७५ सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा दिला होता. २०१५ पासून जगाने खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय योग दिन स्वीकारला आहे. योगाचे महत्त्व सर्वांना समजले आहे. १७५ सदस्य देशांनी यावर स्वाक्षरी केली आहे. हा त्या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय दिवसांपैकी एक आहे. योग हे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.