(रत्नागिरी)
मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या दक्षिण रत्नागिरी विभागाची प्राथमिक फेरी बुधवारी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात घेण्यात आली. या युवा महोत्सवात भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाने १६ कलाप्रकारात सहभाग घेतला होता. त्यापैकी पाच कलाप्रकारात महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी यश मिळविले.
मराठी कथाकथनमध्ये तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या मयुरेश आग्रे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. वक्तृत्व स्पर्धेत तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या पूजा परमार हिने द्वितीय क्रमांक, हिंदी कथाकथनमध्ये प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या सोनिया शुक्ला हिने तृतीय क्रमांक, मेहंदीमध्ये तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या सायली फणसेकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर ग्रुप डान्समध्ये महाविद्यालयाच्या संघाने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. त्यांची मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीत निवड झाली आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव , सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. वैभव कीर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.