(देवळे /वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली दुवेरी पुल ते लाखणवाडी पाखाडी बांधणे या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम उदय अणेराव व काशिनाथ धुमाळ यांच्या हस्ते नुकतेच पार पडला. लाखणवाडी ही गावापासून दुर्गम भागात वसलेली वस्ती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही वाडीतील ग्रामस्थांना गावात ये-जा करण्यासाठी चांगली पायवाट नसणे ही शोकांतिका सौ. स्वप्नाली गुडेकर, श्री प्रकाश खांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष- श्री हुसैन बोबडे यांनी कार्यतत्पर आमदार श्री शेखरजी निकम यांच्या निदर्शनास आणून दिली.
ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष २५१५) या योजनेंतर्गत गोरगरीब जनतेचे कैवारी आमदार श्री शेखर निकम यांनी लाखणवाडी पायवाटेची गांभीर्याने दखल घेत निधी उपलब्ध करुन दिला. पुरेसा निधी उपलब्ध झाल्याने लाखणवाडी पाखाडीचे दिमाखात भूमिपूजन करुन कामाला सुरुवात करण्यात आली.
भूमिपूजन सोहळ्याला सदानंद अणेराव, कुणाल अणेराव, संजय अणेराव, प्रकाश लाखण, रघुनाथ गुडेकर, संदीप लाखण, संतोष गुडेकर, सुरेश करंबेळे, सतीष लाखण, संदेश धुमाळ, सुनील रावणंग, भालचंद्र गुडेकर, संतोष लाखण आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.