30 – 40 हजार रुपये खर्च करून मिळणारा लॅपटॉप आता तुम्हाला 15 हजार रुपयांमध्ये मिळणार असेल तर कोणाला नाही घ्यावासा वाटणार. आता सर्वसामान्य व्यक्तीही लॅपटॉप घेऊ शकतो. तोही अगदी स्वस्त दरात… हो, हे खरं आहे. कारण उद्योगपती मुकेश अंबानी यांचे रिलायन्स जिओ लवकरच 4G सिम कार्ड-लेस लॅपटॉप बाजारात आणत आहे.
रिलायन्स जिओचा दावा आहे की, हा लॅपटॉप जिओ फोनप्रमाणे भारतीय बाजारपेठेतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल. रिलायन्स जिओच्या 4G सिम कार्ड लॅपटॉपची किंमत 15,000 रुपये असेल. सर्वसामान्यांचे बजेट लक्षात घेऊन या लॅपटॉपची किंमत निश्चित करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
रिलायन्स जिओकडे भारतातील 420 दशलक्ष ग्राहकांसह भारतातील सर्वात मोठे टेलिकॉम नेटवर्क आहे. रॉयटर्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लॅपटॉप लवकरच देशातील शाळा आणि सरकारी संस्थांसाठी उपलब्ध होणार आहे. येत्या तीन महिन्यांत तो बाजारात येण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्सने जिओ बुकसाठी टेक बिझनेस कंपनी क्वालकॉम आणि मायक्रोसॉफ्टसोबत करार केला आहे. क्वालकॉम ही कॉम्प्युटिंग चिप्सची निर्माता आहे, तर मायक्रोसॉफ्ट ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम पुरवणारी कंपनी आहे.
बाजारात सध्या कमीत कमी 20 हजार रूपयांपासून मिळतात. परंतु, रिलायन्सचे हे लॅपटॉप 15 हजार रूपयांना मिळणार आहे. त्यामुळे रिलायन्सचा हा लॅपटॉप सर्वात स्वस्त असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. मात्र सर्वसामान्य जनतेला वेगळाच प्रश्न पडला आहे. आधी स्वस्तच गाजर दाखवायचं आणि नंतर लुटायच, अस तर होणार नाही ना? अशीही या नवीन ऑफर बाबत चर्चा सुरु आहे.