(संगलट / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा प्राथ.शिक्षक पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, ४ नोहेंबरला मतदान होणार आहे. या निवडणूकीत दापोली तालुक्यातील सर्वांशी जवळीक असलेले, अजात शत्रू , जि.प.ब्राह्मणवाडी शाळेचे मुख्याध्यापक अशोक मळेकर हे दापोली तालुका सर्वसाधारण उमेद्वार म्हणून निवडणूकीसाठी महायुती पॅनेल मधून उभे आहेत. २४ तास सर्वांसाठी उपलब्ध असणारे शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे.
नानटे चिंचवाडी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळवेकामी त्यांचेच खरे श्रेय आहे, तर आताची ही ब्राह्मणवाडी शाळा अगदी आदर्शवत केली आहे. अशोक तुकाराम मळेकर म्हणजेच (A.T.M.) या नावाने प्रसिध्द असलेल्या या उमेद्वारांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते तमाम सभासदांचे उपस्थित करणेत आले.
यापुढे केव्हाही हाक मारा आपला हक्काचा माणूस अपल्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असणार असे अखिल शिक्षक संघटनेचे दापोली तालुकाध्यक्ष विजय फंड यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, उर्दू शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक संघटना आणि अखिल शिक्षख संघटनेतील असंख्य शिक्षक उपस्थित होते.