(चिपळूण / ओंकार रेळेकर)
दिनांक २०.११.२०२३ रोजी वन विभागाचे अधिकारी / कर्मचारी यांचे मौजे टेरव येथील क्षेत्रीय फिरती दौरा करतेवेळी मौजे टेरव गावच्या पश्चिम दिशेला वेतकोंढ पाण्याची टाकी पासून साधारण १ कि.मी. अंतरावर डोंगरभागात विनापरवाना झाडतोड केलेबाबत व त्यापासून अंदाजे ६. ५०० घनमीटर इतका तयार केलेला लाकूडमाल हा कोळसा भट्टीसाठी रचून ठेवलाला असलेबाबत निदर्शनास आले. याबाबत स्थानिक चौकशी केली असता ही तोड श्री. नागेश यशवंत कदम यांनी केली असल्याचे समजल्याने अधिक चौकशीकरीता त्यांना टेरवगावचे पोलिस पाटील श्री. मोहिते यांचेमार्फत बोलावून घेण्यात आले.
चौकशी दरम्यान श्री.नागेश यशवंत कदम यांनी केलेला गुन्हा निष:पन्न झालेने त्यांचे विरूध्द प्र.गु.रि.क्र.५/२०२३ अन्वये गुन्हा नोंद केला असून तोड झालेल्या क्षेत्रातील विखुरलेला लाकूडमाल जप्त केला असून कोळसा भट्टीसाठी रचून ठेवलेला लाकूडमालाचे भट्टीपासून विलगीकरण केले आहे. यानंतर मौटे टेरव पैकी दत्तवाडी अंतर्गत रस्त्याच्या पूर्वेकडील वराटी या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागामध्ये फिरती दरम्यान वरील प्रमाणेच मालकी क्षेत्रामधील वृक्षांची अवैद्यवृक्षतोड करून तयार केलेल्या लाकूड मालाचे कोळशामध्ये रूपांतर करण्यासाठी रचून ठेवलेला लाकूड माल अंदाजे २३.५०० घनमीटर तर झाडतोड झालेल्या क्षेत्रामध्ये विखूरलेल्या स्वरूपातील ५.५०० घनमीटर इतर लाकूडमाल जप्त करणेत आला.
या प्रकरणी अवैद्यरित्या केलेली वृक्षतोड व कोळसा भट्टीसाठी रचलेला लाकूडमाल हा श्री. संतोष राजाराम कदम रा. टेरव यांनी केला असल्याचे चौकशीदरम्यान निष:पन्न झालेने त्यांचेविरूध्द प्र.गु.रि.क्र. ६/२०२३ नोंद करणेत आला आहे. तसेच दिनांक २१.११.२०२३ रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मौजे टेरव गावच्या पुर्व दिशेस म्हसोबाचा माळ या ठिकाणी वनपाल चिपळूण, वनरक्षक कोळकेवाडी, वनरक्षक रामपूर, वनरक्षक तपासणी नाका पोफळी आणि टेरव गावचे पोलीस पाटील यांनी जावून फिरती केली असता दोन कोळसा भट्टी लावली असल्याचे आढळून आले.
सदर कोळसाभट्टी ही प्रमोद चंद्रकांत मोहिते रा. टेरव यांनी लावली होती व ते त्याचठिकाणी हजर होते सदर ठिकाणी पेटवलेली कोळसा भट्टी उपस्थित वनाधिकारी यांनी उध्वस्त करून टाकली व सदर ठिकाणी उपस्थित असलेले श्री. प्रमोद चंद्रकांत माहिते यांच्यावर प्र.गु.रि.क्र. ०७/२०२३ अन्वये नोंद केला आहे. या तीनही कारवाईमध्ये चिपळूण परिमंडळाचे वनपाल श्री. दौलत रा. भोसले, वनरक्षक कोळकेवाडी श्री. राहूल गुंठे, वनरक्षक रामपूर श्री. राजाराम रा. शिंदे, वनरक्षक वनउपज तपासणी नाका श्री.कृष्णा द.इरमले आणि टेरव गावचे पोलीस पाटील श्री. माहिते यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
वरील तीनही आरोपींचे विरूध्द श्री. राहूल गुंठे, वनरक्षक यांनी गुन्ह्ये नोंद केले आहेत. सदर तीनही आरोपींनी गुन्ह्ये मान्य केले असून त्यांचेविरूध्द शासन नियामानुसार दंड व शिक्षेची कारवाई करणेत येणार आहे. सदर प्रकरणी कारवाई करत असताना मौजे टेरव गावचे पोलीस पाटील श्री. मोहिते यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. सदरची कारवाई ही रत्नागिरी वन विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री दिपक पो. खाडे, सहाय्यक वनसरंक्षक श्री. वैभव सा. बोराटे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती राजेश्री चं. कीर यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आली आहे.
वन विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जनतेस अहवान करणेत येते की, अवैद्य वृक्षतोड, अवैद्य कोळसाभट्टी, अवैद्य शिकार इत्यादीबाबत गुन्ह्यंबाबत कडक शिक्षेच्या तरतुदी असून असे प्रकारण कोणीही करू नयेत किंवा असे करताना आढळल्यास वन विभागास तात्काळ वन विभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ वर कळविणेत यावे.