(होंगझाऊ)
नेमबाज अवनी लेखरासह भारताने सोमवारी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहा सुवर्णांसह आतापर्यंत एकूण 17 पदके जिंकली आहेत. तिच्याशिवाय शैलेश कुमार (पुरुषांची उंच उडी, टी-63 गट), प्रणव सुरमा (पुरुष क्लब थ्रो, एफ-51गट), निषाद (पुरुषांची उंच उडी, टी-47 गट), अंकुर धामा (पुरुषांची 5000 मीटर टी-11 गट), प्रवीण कुमार (पुरुषांची उंच उडी T-64, T-44 गट) यांनीही आपापल्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदके जिंकली.
अवनीचे 249.6 गुणांसह विक्रमी गुण..
राजस्थानच्या अवनीने महिलांच्या R2 10m Air Rifle Standing SH1 प्रकारात 249.6 गुणांच्या खेळातील विक्रमी गुणांसह सुवर्णपदक जिंकले. 21 वर्षीय अवनी 2012 मध्ये रस्ता अपघाताची शिकार झाली, त्यानंतर ती व्हीलचेअरवर आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्राच्या प्रेरणेने तिने 2015 मध्ये नेमबाजीला सुरुवात केली आणि मागे वळून पाहिले नाही.
पुरुषाच्या क्लब थ्रो एफ-51 मध्येही तीन पदके..
भारतीय खेळाडूंनी पुरुषांच्या क्लब थ्रो एफ-51 स्पर्धेतही रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. सुरमाने 30.01 मी.च्या प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले अन् आशियाई पॅरा गेम्सचा नवा विक्रम प्रस्थापित केला, तर धरमबीर (28.76 मी) आणि अमित कुमार (26.93 मीटर) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत फक्त चार स्पर्धक होते, सौदी अरेबियाची राधी अली अलार्थी 23.77 मीटर फेक करून शेवटच्या स्थानावर राहिला.
चार खेळाडू नसल्यामुळे भारताला मिळाले नाही कांस्यपदक…
पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारातही भारताने तीन टॉप-थ्री फिनिश केले होते, परंतु आशियाई पॅरालिम्पिक समिती (APC) नियमांनुसार या स्पर्धेत फक्त सुवर्ण आणि रौप्यपदक मिळाले. या स्पर्धेत केवळ तीन भारतीयांनी आव्हान दिले होते. APC च्या ‘मायनस वन नियम’ अंतर्गत, शैलेशने आशियाई पॅरा गेम्समध्ये 1.82 मीटरच्या विक्रमी उडीसह सुवर्णपदक जिंकले, तर मरियप्पन थांगावेलू (1.80 मीटर) यांनी रौप्यपदक जिंकले. APC नियमांनुसार, गोविंदभाई रामसिंगभाई पडियार (1.78 मी) कांस्य जिंकू शकला नाही. तिन्ही पदके जिंकण्यासाठी किमान चार खेळाडू मैदानात असणे आवश्यक आहे. या स्थितीत भारताला एक पदक गमवावे लागले.
सहा खेळाडूंना मिळाले रौप्य
भारताच्या सहा खेळाडूंनी रौप्यपदक पटकावले. मरियप्पन व्यतिरिक्त, प्राची यादव (परा केनई, महिला VL-2 गट), धरमबीर (पुरुष क्लब थ्रो, एफ-51 गट), रुद्रांश खंडेलवाल (मिश्र 50 मीटर पिस्तूल, एसएच1 गट), रामपाल (पुरुषांची उंच उडी, टी-47गट), कपिल परमार (पुरुषा 60 किलो, ज्युडो-जे1 गट) यांनी रौप्यपदक जिंकले.
कांस्यपदक विजेते
अमित सरोहा (पॅरा क्लब थ्रो, एफ-51 गट), मोनू घनघास (पुरुष शॉट पुट, एफ-११ गट), उन्नी रेणू (पुरुष उंच उडी, टी-64, टी-44 गट), अरुणा तन्वर (महिला तायक्वांदो, के-44 गट), 47 किलो) आणि कोकिला (महिला, ज्युडो 48 किलो, जे2 गट)
पंतप्रधान मोदींनी पदक विजेत्यांचे केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अवीन, शैलेश, प्रणव, निषाद, अंकुर, प्रवीण यांचे अभिनंदन! तुम्ही लोकांनी देशाचा गौरव केला आहे. प्रत्येकाकडे अविश्वसनीय कौशल्ये आहेत. रौप्य आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंचेही मी अभिनंदन करतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.