[ रत्नागिरी / प्रतिनिधी ]
सामाजिक अधिकार हिसकावून घेण्याची ताकद निर्माण करण्यासाठी समाजात सामाजिक व राजनैतिक जागरुकता येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी केले. यावेळी जांभारी येथील सामाजिक युवा कार्यकर्ते शराफत वागळे यांची काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या रत्नागिरी तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी जाहीर केले.
शहरातील काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या रत्नागिरी तालुका अल्पसंख्याक विभागाची बैठक उत्साहात पार पडली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, रमेश शाहा व शब्बीर भाटकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या सभेला मुस्लिम युवकांची चांगली उपस्थिती होती.
देशातील परिस्थिती बघता अल्पसंख्यांक समाजाला स्वतःचे अधिकार मिळवण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संघटित होणे आवश्यक आहे. रत्नागिरी तालुक्यांतील अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्यास काँग्रेस पक्ष अजिबात मागे राहणार नाही, असे शेकासन यांनी ठणकावून सांगितले.
शराफत वागळे यांची रत्नागिरी तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसैन दलवाई, माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस ॲड हुस्नबानू खलिफे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड व इतर नेते व पदाधिकाऱ्यांनी वागले यांचे अभिनंदन केले.
या वेळी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते श्री रमेश शाहा, शब्बीर भाटकर, बरकतभाई काझी, आतिफ साखरकर, नदीम मुजावर, रहिम दलाल, ओवैस फोंडू, इम्तियाज डांगीकर, निसार दर्वे, हुस्नआरा खान, शाह आलम मुल्ला, माहीर कमाल, अस्मा अयमान, शोभना मुजुमदार, अमर शिवलकर, दिपा पाटील, शोभा विचारे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.