(ठाणे/किशोर गावडे)
लग्नाच्या अमिषाने अवघ्या एका १५ वर्षांच्या विवाहित मुलीवर लैंगिक अत्याचार करीत व तिच्याशी विवाह केल्याचा बनाव करत तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या कथित पती अक्षय चौहान याच्यासह पाचजणांविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर 213/2022 भांदवी 376 (3)सह पास्को अधिनियम 2012 कलम 4 (. 2) 6,17, सह बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 चे कलम 9, 10, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चितळसर पोलिसांनी दिली.
ठाण्यातील पोखरण रोड येथे राहणारी अल्पवयीन विवाहित सरीता (नाव बदलले आहे*) वय वर्ष (15) या घटनेच्या फिर्यादी असून तिचे पती अमित व सासरे सुनील व मुलगा दिवांश हे एकत्र राहतात. पती व सासरे हे हाऊसकीपिंगची कामे करतात. सरीताचे आई वडील हे गांधीनगर येथे राहतात. या भागात राहणारा अक्षय सुनील चौहान (24) हा अनेक वर्ष तेथे रहातो. ओळख वाढत गेल, मोबाईल फोनवर बोलणे वाढत गेले. मेसेज पाठवणे सुरू झाले. दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर अखेर प्रेमात जडले गेले.
अक्षयने या पीडितेशी मोबाइलद्वारे संपर्क साधून सातत्याने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करीत होता. आपल्या संबंधातून जन्माला आलेल्या बाळाचे मी संगोपन करीन, आपण लवकरच लग्न करणार आहोत,असे अक्षय चौहान तिला स्वप्ने दाखवत होता. काही महिन्यांत दोघांचे संबंध वाढत गेले. फिर्यादी पाच महिन्याची गर्भवती राहिली. मात्र नंतर लैंगिक संबंधाचे व्हिडिओ माझ्याजवळ आहेत, अशी धमकी देऊन तो तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता, असे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान अक्षय चौहानला ती सातत्याने लग्नाची गळ घालतच होती. नऊ महिने पूर्ण होताच तीने एका गोजिरवाण्या मुलाला जन्म दिल्यानंतर, 15 नोव्हेंबर 2021 रोजी फिर्यादीचे आई-वडील व अक्षयच्या आई-वडिलांनी व घरातील सदस्यांच्या संगनमताने दोघांचा विवाह लावून दिला.
त्यानंतर काही महिन्यांत कौटुंबिक भांडणतंटे सुरू झाले. अक्षयने तिच्या चारित्र्यावर वांरवार संशय घेऊन तिला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. भांडणे टोकापर्यंत पोहोचली. फिर्यादी 15 सप्टेंबर 2022 रोजी आपल्या आई-वडिलांकडे आली. त्यानतर फिर्यादी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीस सर यांच्याकडे आल्या. फिर्यादीने संपूर्ण घटनाक्रम त्यांना सांगितला. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीस यांनी पोलीस उपायुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक चितळसर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर एफ.आय.आर दाखल करण्यात आला व संबंधितांना अटक करण्याची मागणी केली.
चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पती अक्षय चौहान, सासरे सुनील चौहान, सासू चंद्रावती चौहान, ननंद निकिता चौहान, दीर सुरज चौहान व रीना यांनी शिवीगाळ करून मारहाण करणे व सातत्याने छळवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चितळसर पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल केला. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.