( रत्नागिरी / प्रतिनिधी )
अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या संशयिताचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रणेश बाळकृष्ण गाडे (वय ३४, रा. निवेंडी, रत्नागिरी) असे जामीन फेटाळलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीत घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित प्रणेश गाडे काही कामानिमित्त मालगुंड येथील दत्ताराम आग्रे आणि त्यानंतर संदेश महाकाळ यांच्याकडे भाड्याने राहात होता. पीडित अल्पवयीन आहे हे माहित असतानाही तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. आणि त्यातून ती गर्भवती राहिली. तिच्यावर मातृत्व लादले. या प्रकरणी जयगड पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयित आरोपीने जामिनासाठी अर्ज केला. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला.