( राजापूर / प्रतिनिधी )
डुक्कराच्या शिकाऱ्यासाठी ठेवलेला गावठी बॉम्ब खाल्ल्याने बैलाचा जबड्या फाटल्याची दुर्दैवी घटना राजापूर तालुक्यातील निवेली परिसरात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
राजापूर तालुक्यातील निवेली येथील प्रकाश घाणेकर यांच्या बैलाने काल रात्रीच्या सुमारास निवेली मानेश्वर मंदिराच्या परिसरात कातळसडयावर गावठी बॉम्ब खाल्ल्याने जबडा फुटल्याचे दिसून आहे. यासंदर्भात घाणेकर यांनी सागरी पोलिस ठाणे नाटे यांना याबाबत खबर दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बॉम्बशोध पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. जखमी बैलावर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून उपचार करण्यात येत असून बैलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले गेले आहे.
परिसरात बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांकडून शोध मोहीम सुरू असून अन्य कोणत्याही प्रकारचे बॉम्ब सापडले नसल्याचे बोलले जात आहे.मात्र बैलाच्या जबड्यामध्ये सुतळ सदृश्य वस्तू सापडल्याचे आणि गावठी बॉम्बनेच जबड्या फुटल्याची चर्चा सुरू आहे. अशा शिकाऱ्यावर कारवाई करण्याची करण्यात येत आहे.