(नवी दिल्ली)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी समोर आला. मुख्यमंत्री केजरीवालांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत जयप्रकाश या ३८ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी मुंडका येथील रहिवासी असून त्याची मानसिक स्थिती ठीक नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
दिल्लीतील गुलाबी बागमध्ये आरोपीवर उपचार सुरू असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नाही, तथापि त्याची चौकशी सुरू आहे. जयप्रकाशने मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास पोलीस कंट्रोल रूमला फोन करून मुख्यमंत्री केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.