(अयोध्या)
अयोध्या विमानतळ आणि राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने अयोध्या रेल्वे स्थानकाला नवीन नाव दिले आहे. अयोध्येचे खासदार लल्लू सिंह यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “अयोध्या धाम जंक्शन” करण्यात आले आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अयोध्येला पौराणिक स्वरूप देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमध्ये आणखी एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. ३० डिसेंबरला पीएम मोदी अयोध्या धाम जंक्शनचे उद्घाटन करणार आहेत. ‘अयोध्या धाम जंक्शन’ हे तुम्हाला नवीन नाव वाटेल, प्रत्यक्षात आता ते अयोध्या रेल्वे स्टेशनचे नवीन नाव आहे, जे जंक्शनच्या उद्घाटनापूर्वी केंद्राने जाहीर केले आहे. अयोध्येचे खासदार लल्लू सिंह यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टद्वारे ही माहिती दिली.
अयोध्या जंक्शन ‘अयोध्या धाम’ जंक्शन झाले
खासदार लल्लू सिंह यांनी ट्विटरवर लिहिले की, “अयोध्या जंक्शन “अयोध्या धाम” जंक्शन झाले. भारताचे प्रसिद्ध पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य अयोध्या रेल्वे स्थानकाचे अयोध्या जंक्शनचे नाव बदलून अयोध्या धाम करण्यात आले. जनभावनेच्या अपेक्षेनुसार जंक्शन करण्यात आले आहे.”
अयोध्या जंक्शन हुआ “अयोध्या धाम” जंक्शन
भारत के यशस्वी मा॰ प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के मार्गदर्शन में नवनिर्मित भव्य अयोध्या रेलवे स्टेशन के अयोध्या जंक्शन का नाम, जनभावनाओं की अपेक्षा के अनुरूप, परिवर्तित कर #अयोध्या_धाम_जंक्शन कर दिया गया है..
1/2.. pic.twitter.com/WHKpAb5wmO
— Lallu Singh (Modi Ka Parivar) (@LalluSinghBJP) December 27, 2023