(चिपळूण / ओंकार रेळेकर)
ब्लडलाईन ग्रुप चिपळूणचे प्रमुख शिलेदार आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी श्री. अमोलजी भोबस्कर यांनी शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी डेरवण येथे एका रुग्णासाठी आवश्यक असणाऱ्या ए निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटासाठी तातडीने पुढाकार घेऊन ब्लडलाईन ग्रुप चिपळूणच्या माध्यमातून ३३ व्या वेळी रक्तदान केले.
डेरवण हॉस्पिटल येथील सदर रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य निश्चितच गौरवास्पद आहे. अमोल भोबस्कर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल डेरवण रक्तपेढीच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. रक्तदानाच्या या पवित्र कार्यात अमोलजी भोबस्कर नेहमीच अग्रेसर असतात. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्यांनी अद्यापपर्यंत रक्तदान केलेले आहे. ए निगेटिव्ह या दुर्मिळ गटासाठी ३३ वेळा रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
शनिवारी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी डेरवण येथे रक्तदानाच्या या पवित्र कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अमोलजी भोबस्कर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्याबद्दल ब्लडलाईन परिवारासह चिपळूणवासीयांच्या वतीने त्यांचे अभिनंदन होत आहे.