(नवी दिल्ली)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पॉर्न स्टारला पैसे दिल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमधील मैनहॅटन कोर्टात हजर होताच ट्रम्प यांना पोलीसांनी अटक केली आहे. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर अॅडल्ट स्टार प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिली आहे. फौजदारी खटला दाखल असणारे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले माजी राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
ट्रम्प यांच्यावर २०१६ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचारादरम्यान एडल्ट एक्ट्रेस स्टॉर्मी डेनियल्स हिचे तोंड बंद करण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे. माजी राष्ट्राध्यक्षांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याने न्यायालय व बाहेर विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
Former US President Donald Trump arrived at a Manhattan courthouse to be formally charged in a watershed moment as his supporters and detractors noisily rallied outside: Reuters
(Pic: Reuters) pic.twitter.com/NnCanAIPD7
— ANI (@ANI) April 4, 2023
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या ३० पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप आहे. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला तिचं तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा सर्वात गंभीर आरोप त्यांचेवर आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स यांचं अफेअर असल्याचाही आरोप होत आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी पॉर्न स्टारला १ लाख ३० हजार डॉलर्स दिल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी संमती देण्यात आली होती, तेव्हापासूनच त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. आता काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली असून कोर्टात हजर करण्यात आले आहे.
कोर्टात जाण्यापूर्वी ट्रम्प यांनी केला ई-मेल, काय म्हणाले?
माजी राष्ट्रपती ट्रम्प यांनी आपल्या मेलमध्ये म्हटले आहे की, आमचे आंदोलन खूप पुढे गेले आहे. माझ्या मनात कोणताही संशय नाही की, आम्ही पुन्हा एकदा जिंकणार व २०२४ मध्ये पुन्हा व्हाइट हाउसमध्ये जाणार. मी लोकांच्या समर्थनासाठी आभार मानतो. जे घडत आहे, ते पाहणे माझ्यासाठी खूप दु:खद आहे–माझ्यासाठी नव्हे तर आपल्या देशासाठी.