( राजापूर / प्रतिनिधी )
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाचल ग्रामपंचायतीच्यावतीने अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामपंचायत पाचल कार्यालय येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन, महिला बचत गटामार्फत देशासाठी बलिदान दिलेल्या महान स्त्रियांबाबत वक्तृत्व कार्यक्रम, वारकरी संप्रदाय दिंडी सोहळ्याचे आयोजन, रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर गायन व व्याख्यान, पाचल बस स्थानक पासून ऐतिहासिक अशी आझाद टेकडी पर्यंत मशाल यात्रा, आझाद टेकडी येथे सामूहिक ध्वजारोहण, रांगोळी स्पर्धा प्रदर्शन, अमृत महोत्सवी वर्षा निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ. अशा या उपक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत पाचलच्या वतीने करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून पाचल बाजारपेठ स्वच्छता अभियान काल मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलं.
या अभियानामध्ये पाचल गावातील सर्व बचत गटाच्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यामध्ये व्यापारी संघटनेच्या व्यापारांनी- ग्रामस्थांनी देखील सहभाग घेऊन पासल बस स्थानक, जवळेकर फाटा, आठवडा बाजार येथील असलेला कचरा साप व स्वच्छ करून त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावली. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाला सर्व बचत गटातील महिलानी, व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी चांगली प्रतिसाद दिल्याबद्दल पाचल गावचे उपसरपंच किशोर भाई नारकर यांनी सर्वांचे आभार मानले. यापुढे असच सहकार्य ग्रामपंचायतला करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे.