(संगमेश्वर)
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संगमेश्वर तालुका उत्तर विभाग शिक्षण प्रसार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसाची कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे रविवार ( दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी) आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा प्रात्यक्षिकासह मांडला जाणार आहे. तसेच आपल्या कोकणामध्ये भूत, भानामती, मंत्रतंत्र जादूटोणा, देवस्की इत्यादी अंधश्रद्धाबद्दल मोकळेपणाने चर्चा होणार आहे. अंधश्रद्धे मागचा अविवेकीपणा समजून घेऊन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापरकरून चिकित्सक कसे बनायचे? हे युवकांना या कार्यशाळेत उपस्थित राहून आत्मसात करता येईल. तसेच आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात केला तर जीवनातील प्रश्न सहजतेने कमी श्रमात,कमी वेळेत व कमी पैशात सोडवता येतात. हा आत्मविश्वास प्रत्येकाला या कार्यशाळेतून मिळेल. या कार्यशाळेला प्राचार्य हरिभाऊ पाथोडे आणि रवींद्र खानविलकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यशाळा रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, संभाजी नगर नावडी (संगमेश्वर स्टँडच्या वरच्या बाजुला) याठिकाणी आयोजित करण्यात आली असून कार्यशाळा विनामूल्य आहे. दुपारी पोळी भाजीची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला संघटनेकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संगमेश्वर तालुका उत्तर विभाग शिक्षण प्रसार संघाचे स्वप्निल मोहिते, मिलिंद कडवईकर (संगमेश्वर संघटक अभाअनिस) यांनी केले आहे.