(खेड / प्रतिनिधी)
खेड-खोपी मार्गावर दाकी अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या रसिका राजेंद्र सुतार (40) या महिलेचा शुक्रवारी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 फेब्रुवारी रोजी हा अपघात झाला होता. पती राजेंद्र सुतार यांच्यासह त्या नातेवाईकांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या.
साखरपुडा आटोपल्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरी येत असताना असताना चक्कर आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अधिक उपारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला.