(रत्नागिरी)
तब्बल २३ वर्षानंतर रा.भा.शिर्के प्रशालेचे माजी विद्यार्थी भेटताच पुन्हा आठवणींची शाळा भरली. रा.भा शिर्के प्रशालेच्या सन २००० सालातील दहावीच्या बॅचचा जल्लोष जुन्या आठवणींचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती अशा शब्दात शिक्षकांनीही आपल्या आठवणींना उजाळा दिला.
स्वयंवर मंगल कार्यालयात सर्व माजी विद्यार्थी एकत्र जमले. त्यानंतर राष्ट्रगीत, प्रार्थना आणि सुविचार असा परिपाठ झाला. निनाद तेंडुलकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. सुप्रिया मोरे हिने सुविचार सांगितला.
त्यानंतर सुयोग मयेकर,शीतल मिरजकर, कविता कुलकर्णी, प्रसाद शेट्ये, मंदार करंबेळकर, स्वप्नील घाग यांनी मनोगते व्यक्त केली. कल्याणी वैद्य आणि अमित सोनावले यांनी कवितेतून आपली मनोगते मांडत आठवणींना उजाळा दिला. तर कैलास घाग याने वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थी निधीला देणगी दिली.
शिक्षकवर्गातून सी.एस.पाटील, के.डी.कांबळे, नथुराम देवळेकर, मुख्याध्यापक रमेश चव्हाण आणि सौ.कानविंदे यांनी मनोगतातून माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कौस्तुभ पालकर आणि आभारप्रदर्शन गौरव भोई यांनी केले.
यावेळी बी.डी.पोवार, व्ही.डी.घैसास, एस.एन.हर्डीकर, एस.एम.कांबळे, विनय सोहनी, स्नेहा साखळकर, विनोद मयेकर, ए.एस.बागवे, श्रीमती कानविंदे, श्रीमती गुळवणी, श्रीमती काजरेकर, एम.के.शेलार, आर.एस.माळगे, श्री.गोखले, आर.ए.सोसायटीचे ॲड.विजय साखळकर आणि मनोज पाटणकर, श्री.वजरेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा उत्तरार्ध शिर्के प्रशालेच्या रंजनमंदिरमध्ये संपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून जल्लोष केला. ऋचा कुलकर्णी, ह्रषिकेश भोसले, रूपा देशपांडे आणि युवराज पारकर यांनी बहारदार गायन सायंकाळची हि मैफिल रंगवली. वैशाली वैशंपायन हिने अफलातून नृत्य सादर केले.दुर्गेश आखाडे यांनी कोकणी माणूस संगमेश्वरी बोलीतून मांडला. कल्याणी वैद्यने कविता सादर केली.
२००० च्या बॅचने सादर केलेल्या दुर्गेश आखाडे लिखित आणि दिग्दर्शित धम्माल स्किटने सर्वांना पोट धरून हसवले. या स्कीटमध्ये पवन रसाळ, युवराज पारकर, अमित गावडे, गौरव भोई, अमित सोनावले, निनाद तेंडुलकर, आदित्य सावंत ,सुयोग मयेकर आणि शर्वरी बेंदरकर यांनी भूमिका सादर केल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नीलेश केतकर, शर्वरी बेंदरकर, कल्याणी वैद्य आणि युवराज पारकर यांनी केले.