(खेड /प्रतिनिधी)
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जाधव, राकेश जाधव यांनी त्यांचे आभार मानले.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला. आ. शेखर निकम यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते, राजूभाई जाधव, राकेश जाधव यांनी नुकतीच मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात ना. अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. या वेळी जि. प.चे माजी विरोधी पक्षनेते अशोकराव कदम, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रमेश राणे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर, सामाजिक कार्यकर्ते सिकंदर चिपळूणकर आदी उपस्थित होते