(दापोली / प्रतिनिधी)
रत्नागिरीचे माजी पालकमंत्री अनिल परब यांच्या राज्यभर गाजत असलेल्या दापोली येथील साई रिसॉर्टची आता केंद्रीय पथकाच्या सहा जणांच्या टिमने पुन्हा पाहणी केली. या पथकाकडून तयार करण्यात आलेला अहवाल केंद्र शासनाच्या पर्यावरण व वनमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. पथकाकडून मुरुड येथील सुरुवन, रिसॉर्टमधील सेफ्टीक टँकची पाहणी केली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचे साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप केला होता.
गेल्या वर्षीही याच कालावधीत पर्यावरण मंत्रालयाच्या टीमने पाहणी केली होती. टीममध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी असल्याची माहिती मिळत आहे. पर्यावरणाची हानी झाली असेल तर आतापर्यंत काय कारवाई झाली याची या टीमकडून चौकशी करण्यात आली. त्यांच्यासमवेत दापोलीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सर्कल, तलाठी आदी उपस्थित होते.