(मुंबई)
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. आता 28 नोव्हेंबरपर्यंत देशमुखांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. याच प्रकरणातील सहआरोपी कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यापासून अटक होईपर्यंत असा होता प्रवास
मार्च 2021 : देशमुख यांच्याविरोधात परमबीर सिंह यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5 एप्रिल : अनिल देशमुख यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
10 मे : मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावरून ईडीकडून देशमुख यांच्याविरोधात गुन्हा
26 जून : ईडीकडून अनिल देशमुख यांना समन्स
29 जून : अनिल देशमुख यांना ईडीचं दुसरं समन्स
5 जुलै : ईडीकडून अनिल देशमुख यांना तिसरं समन्स
16 जुलै : अनिल देशमुख यांना ईडीचं चौथं समन्स
17 ऑगस्ट : देशमुख यांना ईडीचं पाचवं समन्स
2 सप्टेंबर : ईडीचं समन्स रद्द करण्यासाठी देशमुख यांची न्यायालयात याचिका
29 ऑक्टोबर : अनिल देशमुख यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली