(जाकादेवी / संतोष पवार)
अनादी फाउंडेशन आणि भाजपा युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने जाकादेवी हायस्कूलच्या पटांगणावर युवा महोत्सव आयोजित करण्यात आला असून या युवा महोत्सवात डान्सिंग, सिंगिंग, सौंदर्य स्पर्धा पाहण्यासाठी कलाप्रेमी, गायनप्रेमींसह रसिक प्रेक्षकांची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात राज्याचे मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
३० व ३१ जानेवारी या दोन दिवसीय कालावधीमध्ये मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी हायस्कूलच्या भव्य पटांगणात सायंकाळी ठीक ७ ते १० या वेळेत डान्सिंग, सिंगिंग, प्रिन्स & प्रिन्सेस अशा लक्षवेधी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. जाकादेवी खालगाव सारख्या भागात हा युवा महोत्सव प्रथमच अनादी फाउंडेशन आणि भाजपा युवा मोर्चाने आयोजित केल्याने संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जाकादेवी -खालगाव या विभागातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील युवा नेते प्रतिक सुधीर देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त हा युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, विधानसभा विधानसभेचे आमदार प्रसाद लाड, कोल्हापूर येथील कृष्णराज महाडिक, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार बाळ माने, भाजपा जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, अनादी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतिक देसाई यांसह मराठी सिने सृष्टीतील प्रख्यात कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर पदाधिकारी, युवक, कलाप्रेमी शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या युवा महोत्सवाची जय्यत तयारी जाकादेवी हायस्कूलच्या पटांगणावर सुरू झाली आहे.
हा युवा महोत्सव पाहण्याची सुवर्णसंधी विशेषतः सांस्कृतिक, गायन, वादन क्षेत्रातील नागरिकांना प्राप्त होणार आहे. डान्सिंग, सिंगिंग, सौंदर्य स्पर्धा पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होणार असल्याने या ठिकाणी सर्व व्यवस्था अनादी फाउंडेशन आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती अनादी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रतिक देसाई यांनी दिली. विशेष म्हणजे ३१ जानेवारी रोजी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील धडाडीचे युवा नेते भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तसेच अनादी फाउंडेशनचे धडाडीचे आणि उपक्रमशील अध्यक्ष श्री.प्रतिक सुधीर देसाई यांचा वाढदिवस असल्यामुळे हा युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. प्रतिक देसाई यांनी हा युवा महोत्सवात चांगले योगदान दिले आहे. हा युवा महोत्सव अतिशय जल्लोषात आणि उत्साहात होणार असल्याचे भाजपा युवा मोर्चा कडून सांगण्यात आले.