(खेड / भरत निकम)
अधिवक्ता परिषद कोकण प्रांताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याची कार्यकारीणीची नियुक्तिघोषणेचा कार्यक्रम खेड येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ॲड. पारिजात पांडे (बार कौ. ऑ. महा & गोवा सदस्य), प्रांत कार्यकारीणी उपाध्यक्ष ॲड. प्रकाश साळसिंगकर, प्रातं कार्यकारीणी ज्येष्ठ सदस्य ॲड. दिपक गायकवाड, जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश शेट्ये, प्रांत कार्यकारीणी उपाध्यक्ष ॲड. प्रिया लोवलेकर तसेच जिल्हा उपाध्यक्ष ॲड मिलींद जाडकर व ॲड प्रफुल्ल दामले यांनी उपस्थिती राहून सर्व अधिवक्तांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी ॲड. सिद्धेश बुटाला, उपाध्यक्ष ॲड. धनश्री शशिकांत दाते, ॲड. स्वरूप सुबोध थरवळ, सचिव ॲड. क्षितिज प्रफुल्ल दामले कोषाध्यक्ष – ॲड. स्वप्नील कृष्णा खोपकर, तर सदस्यपदी ॲड. सुशील सुधीर कदम, ॲड. अमेय प्रदीप मालशे, ॲड. रुही अनिल घाडगे, ॲड. दिया देवेंद्र देवळेकर, ॲड. महिमा धुंडीराज सावंत आदींची निवड करण्यात आली आहे. तसेच सल्लागार म्हणून ॲड. केतन सदाशिव पाटणे व मार्गदर्शक म्हणून ॲड. हेमंत कमलाकर वडके यांची नेमणूक केली आहे.