[ दिल्ली ]
भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड अतिशय शिस्तप्रिय न्यायाधीश असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीला विलंब झाल्यावरून माफीही मागितली होती. ही घटना ताजी असतानाच आता मात्र त्यांनी एका वकिलाला माझ्या अधिकारात लुडबूड करू नका, अशा शब्दात खडसावत चांगलेच फटकारले. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी खटल्यांचा उल्लेख करताना, भारताचे सरन्यायाधीश डीआय चंद्रचूड यांनी व्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका वकिलाला फटकारले. लवकर तारीख मिळण्यासाठी वकिलाने खटला आधी नमूद करण्याचा प्रयत्न केला.
काय घडले
लवकर तारीख मिळविण्यासाठी, वकिलाने दुसऱ्या खंडपीठासमोर प्रकरणाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला, तर प्रकरण आधीच सरन्यायाधीशांनी १७ एप्रिलसाठी सूचीबद्ध केले होते.
मी तुम्हाला सुनावणीची तारीख दिली आहे. तुम्ही माझ्या अधिकारांमध्ये लुडबूड करू नका. तुमच्या याचिकेवरील सुनावणीची तारीख १७ एप्रिल आहे. तुम्हाला १४ तारखेला दुसऱ्या खंडपीठासमोर सुनावणी आहे. त्याचा येथे उल्लेख येथे करु नका. तुम्हाला पूर्णपणे माफ केले आहे: पण मलाही माफ करा. सुनावणीची तारीख १७ म्हणजे १७ रोजी आहे. माझ्या अधिकारात हस्तक्षेप करु नका.
– डी. वाय. चंद्रचूड, सरन्यायाधीश