(मुंबई)
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाला मोठा दणका बसला आहे. अदानी समूहातील सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीतून पहिल्या १० मधूनही आपोआप बाहेर पडले आहेत. शेअरमधील होणा-या घसरणीच्या पार्श्वभूमीवर समूहाने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता अदानी ग्रुपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना अदानी ग्रुपच्या कंपन्यांना दिलेल्या कर्जाची माहिती देण्याचे आदेश दिले असल्याचे समजते. तसेच भारतीय बँकांनीही अदानी समूहाची चौकशी सुरू केली आहे.
अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्च ने गेल्या आठवड्यात दिलेल्या अहवालानंतर आठवड्याभरात अदानी समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप तब्बल १०० अब्ज डॉलरने खाली आले आहे. अदानी समूहाने अदानी एंटरप्रायझेस या प्रमुख कंपनीचा २०,००० कोटी रुपयांचा एफपीओ रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे कंपन्यांच्या बाजार भांडवलात घट झाली.
India's central bank (Reserve Bank of India) has asked local banks for details of their exposure to the Adani group of companies, government and banking sources, reports Reuters pic.twitter.com/EHxDfVNmhD
— ANI (@ANI) February 2, 2023
गुरुवारी गौतम अदानी यांची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ५७० रुपयांनी घसरून १५६५ रुपयांवर आला. आरबीआयने अदानी समूहाला दिलेल्या कर्जाची बँकांकडून माहिती मागवली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सची आठवडाभरात जोरदार विक्री झाल्यानंतर शेअर बाजार नियामक सेबी समोर आली आहे. सेबी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या जबरदस्त घसरणीची चौकशी करत आहे. समूहाच्या इतर कंपन्यांचे शेअर्स १० टक्क्याने घसरले आहेत.
गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या १० पैकी ६ सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट लागले. शेअर्सच्या प्रचंड घसरणीमुळे समूहाच्या मार्केट कॅपमध्ये मोेठी घट झाली. अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप २४ जानेवारी रोजी १९ लाख १६ हजार ५६० कोटी रुपये होते. आता ते १० लाख ५१ हजार ८०२ कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजे अवघ्या एका आठवड्यात आदानी समूहाला ७ लाख ९ हजार ७७८ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
आठवडाभरात अदानी समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप तब्बल १०० अब्ज डॉलरने खाली आले आहे. अदानी समूहाने अदानी एंटरप्रायझेस या प्रमुख कंपनीचा २०,००० कोटी रुपयांचा एफपीओ रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे कंपन्यांच्या बाजार भांडवलात घट झाली. त्यामुळे अदानी समुहाला मोठा फटका बसला आहे.
अदानीचे शेअर्स खाली आल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आयबीआयने या प्रकरणात लक्ष घातलं आहे. बँकेचे नियमन करणाऱ्याने आयबीआयने सर्व बँकांकडून अहवाल मागवला आहे. अदानी समूहाला दिलेल्या कर्जाची माहिती देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. त्यामुळे आता गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आयबीआयच्या (RBI) निर्णयानंतर शेअर बाजारात याचे पडसाद उमटल्याचं पहायला मिळालं. ADANI ENT मध्ये तब्बल 24 टक्क्यांची घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. तर इतर कंपन्यांना देखील मोठा फटका बसलाय. अदानी पोर्टमध्ये देखील 5 टक्केची घट दिसून आली आहे. त्यामुळे आता शेअर बाजारात खळबळ चित्र पहायला मिळत आहे.