(मुंबई)
अदानी समूह आता रेल्वे क्षेत्रातही उतरण्याच्या तयारीत आहे. वास्तविक अदानी समूह आता ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म खरेदी करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच आता अदानी एंटरप्रायझेस लवकरच ऑनलाइन रेल्वे तिकीट विक्री करणार आहे. अदानी समुहाचे हे पाऊल इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (IRCTC) ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग व्यवसायात आव्हान देईल. अदानी एंटरप्रायझेसने नुकतीच याची घोषणा केली. अदानी समूहाने भारतीय शेअर बाजाराला यासंदर्भात माहिती दिली. ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म, स्टार्क एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 100 टक्के स्टेक घेण्यासाठी करारावर स्वाक्षरी केल्याची माहिती गटाने दिली.
स्टार्क एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ‘ट्रेनमॅन’ म्हणूनही ओळखली जाते. गुरुग्राम स्थित स्टार्क एंटरप्रायझेस कार्यरत आहे. IIT-रुड़की पदवीधर विनीत चिरानिया आणि करण कुमार हे ट्रेनमॅनचे संस्थापक आहेत. हे भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) अधिकृत ट्रेन तिकीट बुकिंग स्टार्ट-अप आहे. या ऑल-इन-वन ट्रेन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मद्वारे ट्रेन तिकीट बुक करण्याव्यतिरिक्त, तुम्ही पीएनआर स्टेटस, कोचची स्थिती, ट्रेनचे लाइव स्टेटस आणि सीट उपलब्धता यासारखी माहिती देखील मिळवू शकता
गुरुग्राम येथील स्टार्क एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड (SEPL) कंपनी ट्रेनमॅन ही IRCTC अधिकृत ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग स्टार्टअप आहे. SEPL ची स्थापना विनीत चिरानिया आणि करण कुमार यांनी केली होती. कंपनीने नुकतेच गुडवॉटर कॅपिटल, हेम एंजल्स आणि इतरांसह यूएस गुंतवणूकदारांच्या संघाकडून 1 दशलक्ष डॉलर निधी उभारला आहे.