चिपळूण बाजारपेठेत वाढणारी गर्दी लक्षात घेता dysp सचिन बारी यांनी आज सकाळी 8 वाजल्यापासून बाजारपेठेत पायी चालून पाहणी केली. यावेळी अत्यावश्यक सेवेत नेसलेली अनेक दुकाने उघडी दिसली, अशा दुकानदारांना लास्ट वॉर्निंग देण्यात आली. अत्यावश्यक सेवा 11 पर्यंत आणि इतर दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याच्या सक्त सुचनां यावेळी करण्यात आल्या.
Dysp सचिन बारी आणि नगर परिषद ची टीम सकाळीच कारवाई करताना पाहून अनेकांची धावपळ झाली, या टीम ने चिपळून बाजारपेठ आणि गोवळकोट रोड येथील दुकानांची ही पाहणी करून कडक सूचना दिल्या. चिपळूण परिसरात कोविड चे रुग्ण झपाट्याने वाढतायत. बेड अभावी अनेक रुग्ण दगवतायत, अशा परिस्थितीत काही व्यापारी नियम पाळतायत तर काही नियम भंग करतायत.
कोविड संसर्ग टाळायचा असेल तर शासनाने दिलेले नियम पाळावेच लागतील अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी भीती व्यक्त होतेय.