(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ॲङ अनिल परब व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयाचे खासदार श्री. विनायक राऊत यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना.श्री. विजय वडेट्टीवार यांची भेट घेवून हा निधी त्वरीत वितरीत करण्याची मागणी केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील सन २०२१ मध्ये अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेल्या साकवांची पुनर्बांधणी व मजबुतीकरण करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी दि.०८ मार्च २०२२ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांचे दालनात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी प्रशासनाला प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्याप्रमाणे प्रशासनाने २३ कोटी ४५ लक्ष रुपयांची मागणी मदत व पुनर्वसन मंत्रालयाकडे केली होती.
त्या विषयाच्या अनुषंगाने आज गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.ॲङ अनिल परब व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयाचे खासदार श्री. विनायक राऊत यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना.श्री. विजय वडेट्टीवार यांची भेट घेवून हा निधी त्वरीत वितरीत करण्याची मागणी केली. त्याप्रमाणे मंत्री महोदयांनी सुध्दा गरज लक्षात घेवून निधी तातडीने लवकरात लवकर वितरीत करण्याचे आश्वासन दिले.