(रत्नागिरी)
रत्नागिरी म्हणजे नररत्नांची खाण. रत्नदूर्गाच्या कुशीत वसलेले आपले टुमदार रत्नागिरी. जगभरातल्या पर्यटकांना भुरळ पडते ती इथल्या निसर्गदत्त हिरवळीची. सोमेश्वर विश्वमंगल गोशाळा व गोविज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले गेले होते. यावेळी गोशाळा उभारणीसाठी लागेल ते सहकार्य करण्याचे अध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील गोशाळा उभारणीसाठी पंधरा लाख रुपयाची मदत करण्यात असल्याचे सांगितले असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले.
यावेळी उपस्थितांनी आपली मते मांडली. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती निमित्ताने रत्नागिरी शहरातील व परिसरातील भटकी व शेतकऱ्यानी सोडलेली गुरे यांचे संगोपन करण्याचे काम सोमेश्वर शांतीपिठाची गोशाळा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमेश्वर येथील भराडीन देवीच्या मंदिरात संपन्न झाला. मंदिर आणि गोमाता यांचे अतुट नाते आहे.
मंदिराच्या माध्यमातून आपण हिंदू परंपरेचे जतन करत असतो. वस्तुस्थिती मात्र फार भयावह दिसते. रत्नागिरीतील गाईगुरे व वासरे यांचे रस्त्यावर बेवारस प्रमाणे फिरणे. त्यामुळे होणारे विविध अपघात प्लास्टिक खावून गाई गुरांचे होणारे अकाली निधन यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सोमेश्वर येथे श्री. शशिकांत सोहनी यांनी सोमेश्वर शांतीपिठाला दान केलेल्या पाच एकर जागेमध्ये आपण ट्रस्टमार्फत अशा बेवारस व भटक्या गाई गुरांची व्यवस्था करण्याचे ठरविले आहे. गोशाळेच्या माध्यमातून विविध गोमय उत्पादनांची व्यवस्था येथे केली जाणार आहे.
गावातील छत्तीस महिला बचत गट या उपक्रमाला जोडले जाणार आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये गोविज्ञान केंद्रामार्फत संस्कार वर्गाचे आयोजन केले जाणार आहे. गोवंशाचे रक्षण गोआधारित कृषी व्यवस्था कृषी आधारित अर्थनिती, गोआधारित स्वास्थ्यनिती व उर्जानिती या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा ट्रस्टचा विचार आहे. या जागेमध्ये गोशाळा निर्मिती, योगाश्रम, निसर्गोपचार केंद्र, वनऔषधी निर्मिती व वृद्धाश्रम असे विविध उपक्रम चालणार आहेत. देश हिताच्या या सामाजिक व अध्यात्मिक वाटचालीच्या या कार्यात सर्व रत्नागिरीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टमार्फत करण्यात आले.
या उपक्रमाला सोमेश्वर गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. शिवाय भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुका अध्यक्ष संयोग दळी, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, यांसह संतोष बोरकर, संकेत कदम, डॉ. ऋषिकेश केळकर, छाया अनवकर, अशोक पाटील, विनोद पेटकर, अनुजा पेटकर, विराज पंडित, कृष्णा पाटील, अनुरंग घाणेकर, राजेश वाघ, निलेश आखाडे, श्री.झापडेकर, सोहनी काकी, अनिरुद्ध फडणिक, देवेंद्र झापडेकर, सोमेश्वर व चिंचखरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.