(रत्नागिरी)
शहरानजीकच्या कारवांची वाडी येथे महिलेने अज्ञात कारणातून विषारी द्रव्य प्राशन केले. ही घटना गुरुवार, ३ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वा. घडली.
शुभांगी घाणेकर (५४, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे गवत मारण्याचे विषारी द्रव्य प्राशन केलेल्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी तिने राहत्या घरी अज्ञात कारणातून विष प्राशन केले. काही वेळाने तिला अस्वस्थ वाटू लागल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत तेथील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.