(रत्नागिरी)
शहरातील सावरकर नाट्यगृह समोरील एका हॉटेल बाहेर उभ्या केलेल्या दुचाकीच्या डिकीतले २० हजार रुपये अज्ञाताने लांबवल्याचा प्रकार घडला आहे. सदर घटना शनिवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० ते १२ वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत मोहम्मद शाहिर इशामुद्दीन मस्तान (३६, रा. रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी त्याने आपली दुचाकी (एमएच ०८ एवी – ०१०३) सावरकर नाट्यगृहासमोरील हॅशटॅग हॉटेलसमोर उभी केली होती. अज्ञाताने या दुचाकीच्या डिकीमधून रोख १९ हजार ५०० रुपये चोरून नेले. काही वेळाने मोहम्मद मस्तान दुचाकीजवळ गेला असता त्याला दुचाकीमधील रोख रक्कम चोरी गेल्याचे लक्षात आले. त्याने तातडीने शहर पोलिस ठाण्यात दिली धाव घेत तक्रार दाखल केली आहे.