(मुंबई)
‘बिग बाॅस मराठी पर्व ४’ चे सूत्रसंचालक महेश मांजरेकर नसणार आहेत हे आता स्पष्टच झाले आहे. त्याच्या कारणांविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता खुद्द महेश मांजरेकरांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या पर्वांचे यशस्वी सूत्रसंचालन त्यांनी केलेले आहे. मात्र आता ते दिसणार नसल्याने चाहत्यांची निराशा झाली होती. पण आता नवीन होस्ट कोण दिसणार याविषयी सध्या संभ्रम उत्सुकता आहे.
महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत ते बिग बॉसचे सूत्रसंचालन का करणार नाहीत याचे कारण आता स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितलं कि, ‘माझं तीन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट होतं. ते तीन वर्ष मी मन लावून हा शो होस्ट केला व पूर्ण केले’ पुढे ते म्हणाले, ‘अजूनही मला विचारलं तर मी या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करायला तयार आहे. पण मी आता बिग बॉस मराठीच्या सीझनसाठी बांधील नाहीये.’ पुढे त्यांनी असाही स्पष्ट केलं की, ‘मला विचारलं तर मी पूर्ण मेहनतीने शो होस्ट करेन. पण मी नाही केलं तरी माझी नाराजी असणार नाही. मी तेवढ्याच आनंदाने तो कार्यक्रम बघेन.