(संगमेश्वर / प्रतिनिधी)
शासकीय नियोजनशून्य यंत्रणेला जनशक्तीच्या मार्गाने वठणीवर आणण्याचे काम काही तरुणांनी ग्रामस्थांच्या मदतीने केले आहे. तरुण पत्र,कार संदेश जिमन आणि त्यांचे ग्रामस्थ तसेच शेरेवाडी विकास मंच यांच्यावतीने सर्व तरुणाईने जिल्हा परिषद मार्फत अंत्रवली मालपवाडी येथील बांधलेल्या अर्थशून्य पुलाच्या बांधणीविरोधात आणि 14 वा,15 वा वित्त आयोग आणि स्थानिक निधी कामाचं फलक लावण्या संदर्भात आवाज उठवला. मालपवाडी येथील कोणत्याही ग्रामस्थांना न विचारता आणि गरज नसताना सहा लाखापर्यंत खर्चाच्या या पुलाचे बांधकाम कशासाठी आणि कोणाच्या सोईसाठी करण्यात आले? असा सवाल करत सर्व ग्रामस्थ एकवटले.
अर्धवट अवस्थेतील या पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्याबाबत आणि फलकाबाबत उपोषणाची नोटीस ग्रामपंचायतीला देण्यात आली. त्यानुसार उपोषणही करण्यात आले. याची दखल ग्रामपंचायतीला घ्यावी लागली. सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य कराव्या लागल्या. त्या वेळेचे संबंधित कंत्राटदार व अंत्रवली ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व कामे जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येतील असे लेखी आश्वासनही आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले. या विजयामुळे पत्रकार संदेश जिमन व सहकार्यांचे ग्रामस्थ व इतर सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.