(मुंबई / सुरेश सप्रे)
पंचवार्षिक नाट्य परिषद अध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली असून अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी जेष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले यांच्यात चुरस रंगली होती. परिषदेच्या राज्यभरातील 60 सदस्यांनी यासाठी मतदान केले होते. नाट्यपरिषदेचे अध्यक्षपद प्रशांत दामले यांनी जिंकले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली होती. या निवडणुकीत प्रसाद मच्छीद्र कांबळी यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली. अखेर या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी समूहा’चे दहा उमेदवार निवडून आले. तर प्रसाद कांबळी यांच्या पॅनलचे चार उमेदवार नियामक मंडळावर निवडून आले होते.
प्रशांत दामलेंच्या ‘रंगकर्मी नाटक समूहाचे कार्यरत नाट्य परिषद कार्यकारणीवर रंगकर्मी पॅनलचा झेंडा फटकल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिली.
कार्यकारिणीमध्ये अकरा सदस्य निवडून आले आहेत. सहकार्यवाहपदी (तीन पदे) समिर इंदूलकर, पोरके दिलीप आणि ढगे सुनील यांचा समावेश आहे. तर कार्यकारिणीमध्ये अकरा सदस्य निवडून आले आहेत. त्यात संजय देसाई, सविता मालपेकर, दिपक रेगे, सुशांत शेलार, विशाल शिंगाडे, विजय साळुंके, विजय चौगुले, गिरिष महाजन, संजय राहते, क्षिरसागर दीपा, पाटील संदीप सदस्यांचा समावेश आहे.