(पाटपन्हाळे / वार्ताहर)
अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा बालक पालक शिक्षक मेळावा व गुणगौरव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवृत्त प्राथमिक शिक्षक श्री दिवाकर धोंडू कानडे तर प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती श्री सुनील पवार, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर श्रीमती लीना भागवत मॅडम, गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री संदीप भोसले, अखिल जे जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर, माजी विस्तार अधिकारी गणपत पांचाळ, केंद्रप्रमुख नामदेव लोहकरे, माजी केंद्रप्रमुख सुभाष पवार ,केंद्रप्रमुख तुकाराम निवाते, सिद्धी सावंत मॅडम, सिद्धी चव्हाण, सोनटक्के मॅडम, गुहागर हायस्कूलचे मधुकर गंगावणे, अखिल दापोली संघाचे अध्यक्ष फड, समितीचे सरचिटणीस नरेंद्र देवळेकर, संघाचे तालुकाध्यक्ष दीपक साबळे, जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल धुमाळ, अपंग कर्मचारी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम, रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार श्री संतोष सांगळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती रोहीलकर, चंद्रकांत दाभोळकर, संदीप घाडे, गणेश खांडेकर, हरिश्चंद्र घाणेकर, संतोष भेकरे, संतोष खोचाडे, किरण सूर्यवंशी, निलेश खामकर, शिक्षक नेते चंद्रकांत पागडे, माजी अध्यक्ष सुरेश बोले, अखिल गुहागर तालुकाध्यक्ष मनोज पाटील, सरचिटणीस प्रकाश जोगले, राजेंद्र वानरकर, अशोक पावसकर, अशोक गोरेवले, मोहन पागडे, सतीश विचारे, अंजनवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक गोरीवले, पाचेरी आगर हायस्कूलचे मुख्याध्यापक गणेश कुलकर्णी, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सुरक्षाताई रोहीलकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार सनई व भालू. बाजा ताशा यांच्या गजरात मान्यवरांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. वेलदूर नवानगर शाळेतील विद्यार्थ्यांनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले. दीपप्रज्वलन माजी सभापती सुनील पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत पागडे यांनी केले. त्यावेळी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी, एकलव्य पुरस्कार विजेते विद्यार्थी दत्तप्रसाद सांगळे व सलोनी पालशेतकर, एसएससी व एच एस सी मध्ये विशेष प्राविण्य मिळवणारे सर्व विद्यार्थी, राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षिका शरयू वैद्य, उपक्रमशील शिक्षक मनोज नाखरे, स्वच्छता मॉनिटर उपक्रमामध्ये उल्लेखनीय सुयश प्राप्त करणाऱ्या माधवी मारुती पाटील, निवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी गणपत पांचाळ, निवृत्त केंद्रप्रमुख सुभाष पवार, कृष्णा पागडे, जनार्दन साळवी, विजय बेंदरकर, सनई वादक गणेश खांडेकर, सांस्कृतिक कलाकार चंद्रकांत दाभोळकर, सांस्कृतिक कलाकार संदीप घाडे, केंद्रप्रमुख तुकाराम निवाते, गटशिक्षण अधिकारी लीना भागवत मॅडम, सभापती सुनीलजी पवार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी भागवत मॅडम यांनी अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे शैक्षणिक क्षेत्रातले काम उल्लेखनीय असून त्यांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती ते बारावीपर्यंत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद दिले.
गुहागर तालुक्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अखिल संस्थेचे कार्य बहुमोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. अखिल संस्था शिक्षक बालक पालक यांच्यासाठी विविध उपक्रम राबवत असून त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे ते म्हणाले. माजी सभापती सुनीलजी पवार यांनी अखिल संघाचे कार्य दैदिप्यमान असून गेली तीस वर्षे अखंडितपणे हा उपक्रम सुरू असल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. हा एक स्तुत्य उपक्रम असून याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असे ते म्हणाले.
अध्यक्ष श्री दिवाकर कानडे म्हणाले की संस्थेचा संचित निधी यांच्या व्याजातून हा कार्यक्रम केला जात आहे. त्या सर्व दाते देणगीदार यांचे त्यांनी शतशः आभार मानले. अध्यक्ष स्थानाचा बहुमान दिल्याबद्दल अखिल पदाधिकारी यांचे आभार मानले. मी अखिलचा निष्ठावंत पाईक असून शेवटपर्यंत अखिल संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यरत राहील असे ते म्हणाले. स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांनी सजग राहणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश जोगले यांनी केले.