(खेड)
खेड तालुक्यातील भडगाव-खोंडे येथील ‘आयसीएस’ महाविद्यालयात पोलिस निरीक्षक निशा जाधव यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ (अफू, चरस, गांजा, कोकेन) शरीराकरिता कशाप्रकारे हानिकारक आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी अमली पदार्थ सेवन न करण्याबाबत शपथग्रहण करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच ‘एहसास’ अंतर्गत सायबर क्राईम ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन लॉटरी याविषयी माहिती देऊन जागरूक राहण्याचा सल्ला दिला.