रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे उद्या मंगळवार दिनांक 19 एप्रिल रोजी कोरोनाच्या दोन वर्षांनी प्रथमच निर्बंधमुक्त अंगारकी साजरी होत आहे. यावेळी घाटमाथ्यावरील सुमारे दोन ते अडीच लाख भाविक दर्शनासाठी व यात्रोत्सवाला आपली उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अंगारकी निमित्ताने जिल्हा प्रशासनासह संस्थान श्री देव गणपतीपुळे आणि ग्रामपंचायत गणपतीपुळे यांच्यावतीने चोख व्यवस्थापन करण्यात आले आहे.
या अंगारकीच्या पार्श्वभूमीवर जयगड पोलिस ठाण्याच्या अख्यतारीत जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग व अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दहा पोलीस अधिकारी व 145 पोलीस कर्मचारी तसेच 30 दंगल नियंत्रक पथकाचे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यावेळी संपूर्ण मंदिर व गणपतीपुळे परिसरात तसेच समुद्र किनार्यावर कुठलाही अनुचित प्रकार व दुर्घटना घडणार नाही यासाठी सर्व पोलिस यंत्रणा ठिकठिकाणी कार्यरत राहणार आहे.
या निमित्ताने गणपतीपुळे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे च्या वतीने अतिशय चोख नियोजन करण्यात आले असून भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात दर्शन रांगांची व्यवस्था अतिशय सुयोग्य रित्या करण्यात आली आहे. त्यामध्ये दर्शन रांगांवर भाविकांच्या सोयीसाठी सावलीचे आच्छादन करून दर्शन रांगांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच या निमित्ताने सकाळी पहाटे साडेतीन वाजता स्वयंभू गणेश मंदिर उघडल्यानंतर प्रारंभी मंदिराच्या मुख्य पुजारी यांच्या हस्ते पूजा-अर्चा व आरती मंत्रपुष्प झाल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.
यावेळी घाटमाथ्यावरील कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, कवठेमहाकाळ, मिरज, कराड, इस्लामपूर आदी ठिकाणांहून भाविक लाखोंच्या संख्येने दाखल होतील असा अंदाज मंदिर व्यवस्थापन समिती आणि सर्वच विभागांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने विशेष आरोग्य पथक मंदिर परिसरात तैनात करण्यात आले आहे.
यावेळी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंतनू वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन डॉक्टर मधुरा जाधव व त्यांचे सर्व सहकारी कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने कुठलीही समस्या उद्भवल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व पथक दक्ष राहून सेवा पुरविणार आहे त्यानिमित्ताने विविध विविध संस्थांचे व संघटनांचे प्रतिनिधी देखील अंगारकी च्या निमित्ताने विशेष सहकार्य करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
प्रथमच कोरोना निर्बंधमुक्त अंगारकीसाठी घाटमाथ्यावरून गणेश मंडळे येणार !
दरम्यान, यापूर्वी गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात होणाऱ्या अंगारकीसाठी घाटमाथ्यावरील विविध गणेश मंडळे भाविकांसाठी महाप्रसाद व खिचडी प्रसाद करीत होती. मात्र गेल्या दोन वर्षात अंगारकी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुरेशा प्रमाणात झालेली नसल्याकारणाने भाविकांसह घाटमाथ्यावरील विविध गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. परंतु यंदा प्रथमच गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात कोरोनानंतर निर्बंधमुक्त अंगारकी होत असल्याने घाटमाथ्यावरील विविध गणेश मंडळांकडून भाविकांना महाप्रसाद व खिचडी वाटप केले जाणार आहे.
तसेच रात्री फटाक्यांच्या आतषबाजीत विविध गणेश मंडळांकडून अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाचा आनंद देखील व्यक्त करण्यात येणार आहे. यावेळी रात्री चंद्रोदयानंंतर गणेश मंदिर बंद होणार असल्याची माहिती गणपतीपुळे देवस्थान समितीकडून प्राप्त झाली. यावेळी सायंकाळी चार वाजता संस्थान श्री देव गणपतीपुळे च्या वतीने स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गेेेे ढोल-ताशांच्या गजरात व फटा फटाक्यांच्या आतषबाजीत करणार आणण्यात येणार आहे. या वेळी पालखी मिरवणूक संस्थांचे सरपंच डॉक्टर विवेक भिडे व त्यांचे सर्व पंच ,मुख्य पुजारी , कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूणच अंगारकी चतुर्थी यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे, ग्रामपंचायत गणपतीपुळे व जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !