(खेड/ प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील दाभिळ येथे घराच्या अंगणात उभी केलेली दुचाकी चोरीस गेल्याची घटना 31 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष बबन शिंदे (38, लवेल, धनगरवाडी, खेड) यांनी गणेश गोवळकर यांच्या घराचे अंगणात हिरो कंपनी डिलक्स दुचाकी उभी करून ठेवली होती. ते एक दिवसासाठी बाहेरगावी गेलेले असताना अज्ञाताने अंगणात उभी केलेली दुचाकी चोरून नेली. घरी आल्यानंतर संतोष बने यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची फिर्याद खेड पोलीस स्थानकात दिली.
शिंदे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.