महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण विषयक सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्यात दरवर्षी पोषण महिना व पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो त्याच अनुसरून या वर्षी केंद्र शासनाने सप्टेंबर२०२२ हा महिना “राष्ट्रीय पोषण” म्हणून साजरा करण्याबाबत निर्देश केले असून राज्यात सदर अभियान विविध प्रकारे साजरा केला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात हेदवी अंतर्गत बिट- १ व २ हेदवी बिटच्या पर्यवेक्षिका अंकिता महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पोषण आहार अभियान व एकात्मिक बालविकास योजनेचा हा उपक्रम गाव वाडीवस्तीवर जवळ जवळ १ महिनाभर राबवत समाजात आरोग्य पूरक पोषण आहाराला किती महत्त्व आहे यावर जनजागृती करण्याबरोबरच या अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धा, पाक कलाकृती, सुदृढ बालक, स्पर्धा, घरोघरी जाऊन महिलांना सकस आहार बाबत मार्गदर्शन करणे. परसबाग, वृक्षलागवड व स्वच्छता विषयक मार्गदर्शन, प्रभात फेरी, बेटी बचाओ बेटी पाढाओ, मुलगा-मुलगी भेद नसावा असे विविध उपक्रम राबवत गुहागर तालुक्यातील हेदवी अंतर्गत बीट क्र. -१ व बीट-२ चा “राष्ट्रीय पोषण अभियान” कार्यक्रमाचा समारोप हेदवी बिटच्या पर्यवेक्षिका- अंकिता महाडिक व गुहागर प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी – पी.पी.केळस्कर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शुक्रवार- २३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वा.प्राथमिक शाळा नं.१ पालशेत येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले आरोग्य अधिकारी- प्रताप गुंजोटे यांनी सकस पोषण आहार विषयी बहुमूल्य असं मार्गदर्शन केले. तर आरोग्य सेवक मुदमवार यांनी आरोग्य विषयी महत्वपूर्ण माहीत दिली. त्याच प्रमाणे अडुर येथील पालक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जनजागृतीपर कोकणातील पारंपरिक टिपरी नृत्य व विविध गीते सादरीकरण करत कार्यक्रमाला रंगत आणून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाला पर्यवेक्षिका – अंकिता महाडिक, प्राथमिक शाळा नं.१ पालशेतच्या मुख्याध्यापिका -सबनिसकर मॅडम व सहकारी शिक्षक, आरोग्य सेविका-अंकिता पालकर यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाला आरोग्य सेवक, आशा सेविका, त्याचप्रमाणे एकूण ४६ अंगणवाडी सेविक व मदतनीस, पालक वर्ग यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालशेत बाजारपेठच्या अंगणवाडी सेविका- वर्षा देवळे यांनी केले तर पालशेत -निवोशी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविका यांनी हा समारोप कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी बहुमूल्य असं योगदान दिलं. पर्यवेक्षिका अंकिता महाडिक यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !