(रत्नागिरी / प्रतिनिधी)
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रखडलेले मार्च व एप्रिल महिन्याचे अर्धे अर्धे मानधन आता त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी मे महिन्याच्या मानधनाची अजूनही प्रतिक्षा आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत जमा करा, असे आदेश न्यायालयाने काही वर्षापूर्वी दिले आहेत. त्यानुसार मानधन जमा होईल, असे आश्वासन शासन देत आहे. मात्र त्याची प्रत्यक्षात आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही. मध्यंतरी एप्रिल महिना संपत असला तरी मार्च महिन्याचे मानधन जमा झाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संघटनेने या बाबत प्रशासनाला जा विचारल्यानंतर दोन्ही महिन्यांचे अर्धे अर्धे मानधन जमा करीत एप्रिल महिन्यात उर्वरित मानधन व एप्रिलपासून वाढीव मानधन जमा करण्यात आले आहे.