(नवी दिल्ली)
अँड्रॉईड यूजर्सना सायबर तज्ज्ञांनी एक सावधानतेचा इशारा दिला आहे. शॅमेलिऑन ट्रोजन नावाचा एक मालवेअर सध्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर हल्ला करत आहे. फोनच्या सर्व सिक्युरिटी भेदून हा मालवेअर फोनमधील पासवर्ड आणि इतर महत्त्वाची माहिती सहज चोरत आहे.
ब्लिपिंग कम्प्युटर वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कॅमेलनऑन ट्रोजन बंडलमध्ये रनटाईम डिटेक्ट होत नाही. यामुळेच त्याला मोबाईलवरील गुगल प्रोटेक्ट अलर्ट आणि सिक्युरिटी सॉफ्टवेअर आरामात बायपास करता येतात. याचे पूर्वीचे व्हर्जन हे ऍक्सेसिबिलिटी फीचरचा वापर करुन घेत होते. मात्र, नवीन व्हर्जन सुरक्षा सेंिटगमध्ये असणा-या त्रुटींचा वापर करून घेत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. हल्ली मोबाईल फोन वापरणारे वापर करते आपल्याला सर्वत्र पाहायला दिसतात. तो आपल्या जीवनाच्या सगळ्यात महत्त्वपूर्ण हिस्सा आहे.
स्मार्टफोन ही केवळ फोनच नव्हे तर व्यक्तीची जीवन कुंडली बनली आहे. खासगी ते सार्वजनिक जीवन आणि त्यातील सर्व आर्थिक घडामोडींची माहिती मोबाईल फोनमध्ये कैद झाली आहे. अनेकांचा मोबाईल फोन काही काळ काम करत नसेल तर त्यांची परिस्थिती विचित्र होते. आपला फोन चालत नसेल किंवा त्यात “बग” आल्यानंतर तो सोडवण्यासाठी आपण अनेक साइट्सचा वापर करतो. सरकारची सायबर सुरक्षा एजन्सीने अलीकडेच चेतावणी दिली. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा व्हायरस यूजर्सचे युजरनेम आणि पासवर्ड सारख्या गोष्टी चोरत आहे. विशेष म्हणजे, हा मालवेअर मोबाईमध्ये कुठेही जाऊ शकतो. फेस आयडी, फिंगरप्रिंट अशा गोष्टींना हा मालवेअर डिसेबल करून टाकतो. त्यामुळे मोबाईलची सिक्युरिटी सिस्टीम निकामी होऊन जाते. थ्रेट फॅब्रिक नावाच्या कंपनीने याबाबत रिपोर्ट दिला आहे.
अँड्रॉईड ऍप्सचा वापर
शॅमेलिऑन ट्रोजन हा मालवेअर फोनमध्ये शिरण्यासाठी गुगलच्या प्लेस्टोअरवरील ऍप्सचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, गुगल क्रोम आणि इतर सुरक्षित ऍप्सना चिटकून हा मालवेअर फोनमध्ये येतो. रंग बदलणारा सरडा ज्याप्रमाणे लक्षात न येता एखाद्या गोष्टीवर चिटकून राहू शकतो, त्याप्रमाणेच हा मालवेअर येत असल्यामुळे याला शॅमेलिऑन असे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी देखील हा मालवेअर समोर आला होता, मात्र आता याचे अपडेटेड व्हर्जन पुढे आले आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यापासून बचाव करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे, कोणत्याही वेबसाईटवरुन ऍप्स डाऊनलोड न करणे. केवळ गुगलच्या प्ले-स्टोअरवरील ऍप्स सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच ठराविक विश्वासू ऍप्स वगळता इतरांना ऍक्सेसिबिलिटी सेटिंगचा ऍक्सेस न देणे देखील गरजेचे आहे. यासोबतच आपल्या स्मार्टफोनची ओएस अपडेट ठेवल्याने देखील तुम्ही सुरक्षित राहू शकता.