(मुंबई)
राज्यात गेल्या २ महिन्यांनंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. राज्य सरकारने याबाबत माहिती दिली. जुलै महिन्यातच या रुग्णाचा मृत्यू झाला होता, पण मुंबई महापालिकेच्या रेकॉर्डवर आता नोंद करण्यात आली आहे. फक्त त्याची नोंद काल घेण्यात आली, असे सरकारतर्फे स्पष्ट कर करण्यात आले आहे. कोरोना या रोगाच्या संक्रमणाने अनेक लोकांनी आपले प्राण गमावले. मात्र, या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस घट होऊन मृतांची संख्याही कमी होत आहे. दरम्यान, मागील २ महिन्यांपासून एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नव्हती. मात्र, काल झालेल्या नोंदीमुळे पुन्हा एकदा तणावाचे वातावरण पसरले आहे.
मृत व्यक्ती 75 वर्षीय मुंबईतील रहिवासी असून त्याला यकृताचा कर्करोग झाला होता. त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असली तरी हा व्हायरल त्याच्या प्राथमिक मृत्यूसाठी जबाबदार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, मुंबईत 10 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण संसर्ग संख्या 11,64,108 वर पोहोचली. तर ताज्या मृत्यूने एकूण मृत्यूची संख्या 19,776 वर नेली. ऑगस्ट महिन्यामधील ही दुसरी वेळ आहे की शहरात कोविड प्रकरणे दुहेरी अंकात नोंदली गेली आहेत; यापूर्वीची घटना 6 ऑगस्ट रोजी घडली होती.
रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असून त्यामुळे चिंतेचं कोणतंही कारण नाही. आणखी चार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण बरे झालेल्यांची संख्या 11,44,285 झाली आहे. सध्या मुंबईत 47 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 292 चाचण्या घेण्यात आल्या, त्यामुळे एकूण चाचणी संख्या 1,89,17,951 झाली आहे.