नासा अवकाश संस्था अंतराळात होत असलेल्या बदलांची आणि त्याच्याशी संबंधित नवीन अपडेट्सची माहिती देत असते. यावेळी नासाने पृथ्वीवर येणा-या नवीन धोक्याचा इशारा दिला आहे. एक विशाल २०० फूट लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे. नासाने या उपग्रहाचा वेग, पृथ्वीपासूनचे त्याचे अंतर याबाबतची माहिती दिली आहे.
अॅस्टरॉइड म्हणजेच लघुग्रह. हे लघुग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात. अवकाशातून अनेक लघुग्रह हे पृथ्वीच्या दिशेने येत राहतात. यापैकी काही अगदी लहान आहेत तर काही थेट समुद्रात पडतात. पण कधीकधी काही मोठे लघुग्रहही पृथ्वीवर पडण्याची शक्यता असते. त्यांच्यामुळे होणारा विध्वंस विचारांच्या पलीकडचा आहे. शास्त्रज्ञांच्या मते हा लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक नाही. लघुग्रह आणि पृथ्वी यांच्यातील अंतर खूपच कमी असले तरीही ते पृथ्वी जवळून जाणार असून, त्याचा आपल्याला धोका नाही. हा लघुग्रह एवढा मोठा आहे की तो एखादे शहर सहज पुसून टाकू शकतो.
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने हा लघुग्रह पृथ्वीवर येणार नाही अशी ग्वाही दिली आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे प्लॅनेटरी डिफेन्सचे प्रमुख रिचर्ड मॉइसेल यांनी सांगितले की, हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता फार कमी आहे. खगोल शास्त्रज्ञांसाठी निरीक्षण करण्यासाठी ही एक पर्वणी असेल. व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रोजक्टद्वारे ही खगोलीय घटना पाहता येणार आहे.