(रत्नागिरी)
रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा पतसंस्था फेडरेशन आणि सहकार खातं यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पतसंस्थांच्या कार्यशाळेला संस्था प्रतिनिधींनी भरभरून प्रतिसाद दिला. CRAR आणि पोटनियम दुरुस्ती संदर्भातील विवेचन या कार्यशाळेत करण्यात आले.
पोटनियम दुरुस्ती समितीवर डॉ. सोपान शिंदे जिल्हा उपनिबंधक रत्नागिरी यांची नियुक्ती झाली. त्याबद्दल जिल्हा फेडरेशनच्या वतीने त्यांचा सत्कार जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांचे हस्ते करण्यात आला.
या कार्यशाळेत CRAR संदर्भानी परिपत्रकावर विवेचन अत्यंत सोप्या भाषेत ओघवत्या शैलीत अत्यंत प्रभावीपणे ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले. या नव्या युगात पतसंस्थांचा CRAR किमान ९% ठेवणे अनिवार्य आहे. संस्थांचा स्वनिधी अत्यंत महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या घटकांमध्ये धोका पातळी किती याबाबत स्टॅंडर्ड सहकार खात्यांनी ठरवली आहेत. त्यानुसार कर्ज, रोखशिल्लक, बँक बॅलन्स, सोनेतारण कर्ज, तारणी गृहतारण कर्ज, जामीन कर्ज, मालमत्तेतील गुंतवणुका, स्टेशनरी, डेड स्टॉक इत्यादी गोष्टींचा CRAR वरील प्रभाव कर्ज धोरण, गुंतवणूक धोरण इत्यादी बाबींचा अहापोह करत CRAR संकल्पना अॅड. दीपक पटवर्धन यांनी मांडली. कॅपिटल रेशो टू असेट रेशो म्हणजेच भांडवल पर्याप्तता ही पतसंस्थांची सक्षमता दर्शवणारे प्रमाण आहे. पुढच्या वर्षापर्यंत रत्नागिरीतील सर्व पतसंस्थांचा CRAR १५% च्या वर नेण्याचा संकल्प करून रत्नागिरीतील पतसंस्थांची सक्षमता सहकार जगताला दाखवून देऊया अस आवाहन अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
या कार्यशाळेत पतसंस्थांचे कार्य पोटनियमांचे परिघात करावे. पोटनियमांची माहिती संस्थांनी नेटकेपणे ठेवावी. कायदा कानू आणि पोटनियम यांचे महत्त्व ओळखून संस्थानी आपल्याला सोयीचे होतील असे पोटनियम कायद्याच्या परिघात तयार करावेत. मात्र त्याचे पालन कटाक्षाने करावे असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले.
या कार्यशाळेत रत्नागिरीतील १५० प्रतिनिधी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात श्री.संतोष थेराडे, श्री.आरेकर, डॉ.गिम्हवणेकर, डॉ.जोशी, श्री.मोहन बापट आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.