इंटरनेटवर इंफॉरमेशन म्हणजे माहितीचा खजिना आहे. यातील जवळपास सर्वच माहिती भाषेत उपलब्ध आहे. ही माहिती जर तुम्हाला मराठीतून वाचायची असेल तर तुम्हाला ती भाषांतरित करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला एखाद्या ट्रान्सलेटरकडे जाण्याची गरज नाही. टेक्नॉलॉजीनं प्रत्येक क्षेत्रात लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपाय शोधले आहेत. आता तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये कंटेंट तुमच्या भाषेत ट्रान्सलेट करू शकता.
सध्या अनेक सारे अॅप्स आणि वेबसाइट आहेत ज्या इंग्रजीतून मराठी किंवा इतर भाषेत कंटेंट ट्रान्सलेट करतात. कंप्यूटर प्रोग्रामच्या माध्यमातून होणारं ट्रान्सलेशन इतकं अचूक नसतं परंतु तुम्हाला कंटेंट समजण्यालायक ट्रान्सलेशन मिळू शकतं. आज आम्ही तुम्हाला काही अशा अॅप्स आणि वेबसाइटची माहिती देणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही इंग्रजीतून मराठी किंवा इतर भाषेत कंटेंट ट्रान्सलेट करू शकता.
इंग्रजीतून मराठी अनुवाद ट्रान्सलेट करणार अॅप्स
- Google Translate
- Microsoft Translator
- Hi Translate
- Marathi-English Translator
- Translate All
- English to Marathi Translator
- English Marathi Dictionary
गुगल ट्रान्सलेट
आमच्या यादीत ट्रान्सलेशनसाठी सर्वात पहिला ऑप्शन गुगल ट्रान्सलेटचा आहे. हा ऑनलाइन ट्रांसलेशनसाठी सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. ह्याच्या मदतीनं तुम्ही 130 भाषांमध्ये अनुवाद करू शकता. मराठीसह इतर भारतीय भाषा जसे की तामिळ, तेलुगू, हिंदी, बंगाली सारख्या भाषेत देखील ट्रान्सलेट करू शकता. हे अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. तसेच वेबसाइट स्वरूपात देखील गुगल ट्रान्सलेट उपलब्ध आहे.
मराठी-इंग्लिश ट्रान्सलेटर
इंग्रजीतून मराठीत अनुवाद करायचा असो किंवा मराठीतून इंग्रजीत Marathi-English Translator अॅप देखील एक चांगला ऑप्शन आहे. मराठी आणि इंग्रजीसह ह्याच्या मदतीनं इतर भाषांमध्ये देखील ट्रान्सलेट करता येतं.
ट्रान्सलेट ऑल अॅप
Translate All अॅपच्या मदतीनं देखील युजर्स अनेक भाषा मराठी किंवा इतर भाषांमध्ये ट्रान्सलेट करू शकतात. ह्या अॅपची गंमत म्हणजे ह्याच्या मदतीनं फोटोमधील टेक्स्ट देखील ट्रान्सलेट करता येतो. हे अॅप मराठी सह दुसऱ्या भारतीय भाषांना देखील सपोर्ट करतं.
मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेटर
Microsoft Translator देखील इतर भाषांमधून मराठी ट्रान्सलेशनसाठी चांगला ऑप्शन आहे. मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेट अॅप अँड्रॉइड युजर्स प्ले स्टोर आणि iOS युजर्स अॅप्स स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. मायक्रोसॉफ्टच्या अॅपमधून इतर भाषा देखील ट्रान्सलेट करता येतात.
इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेटर अॅप
English to Marathi Translator अॅपच्या मदतीनं इंग्रजीतून मराठी आणि मराठीतून इंग्रजीत सहज अनुवाद करता येतो. हे अॅप ऑफलाइन देखील वापरता येतं. हे अॅप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करता येईल.
इंग्लिश मराठी डिक्शनरी
इंग्रजीतून मराठीच्या शब्दांचा अर्थ असो किंवा अनुवाद English Marathi Dictionary अॅप एक चांगला ऑप्शन आहे. हे अॅप देखील ऑफलाइन वापरता येतं. ह्या अॅपच्या मदतीनं युजर्स इंग्रजी भाषा शिकू देखील शकतात. ह्यासाठी गेम आणि टास्क देण्यात आले आहेत.
हाय ट्रान्सलेट
इंग्रजीतून मराठी किंवा इतर भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी Hi Translate अॅप देखील चांगला ऑप्शन आहे. हे अॅप अँड्रॉइड आणि iOS दोन्ही लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर वापरता येतं. ह्या अॅपच्या मदतीनं युजर्स 100 पेक्षा जास्त भाषा ट्रान्सलेट करू शकतात.